आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबा लागवड:जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंबा लागवडीस प्राधान्य द्यावे : जिल्हाधिकारी रामामूर्ती

बुलडाणा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंबा हे एक चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञांशी संपर्क ठेवून चांगल्या पद्धतीने लागवड करून उत्पादन दुप्पट किंवा तिप्पट करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले. येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने तालुक्यातील सातगाव म्हसला येथील आंबा उत्पादक शेतकरी औचितराव पालकर यांच्या शेतात १० जून रोजी शेती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. एस. रामामूर्ती, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये, प्राचार्य डॉ. सतीश जाधव, कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिल एस. तारू, औचीतराव पालकर यांच्यासह आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिल एस. तारू यांनी आंबा पिकाचे महत्व, विविध लागवड पद्धती, तंत्रज्ञान तसेच सघन लागवड पद्धत याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बुलडाणा जिल्ह्यात आंबा लागवडीस शेतकऱ्यांचा वाढता कल लक्षात घेता शास्त्रीय पद्धतीने लागवड व्हावी, तसेच जिल्ह्यातील विविध आंबा जातींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी आणि शास्त्रज्ञांना लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता यावे, यासाठी आंबा शेती दिनाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शेतकरी पालकर यांनी आंबा अतिघन लागवड पद्धत, शेतात केलेले नवनवीन प्रयोग या बद्दल जिल्हाधिकारी राममूर्ती यांना अवगत केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आंबा बागेत जाऊन सघन लागवड पद्धत व लागवड केलेल्या विविध आंबा वाणांची पाहणी केली. कार्यक्रमाला सरंपच नीलेश देठे, पोलिस पाटील संदीप पालकर, प्रगतशील शेतकरी कल्याणराव कानडजे, नारायण पिंपळे, पवन पवार यांच्यासह असंख्य शेतकऱ्याची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार डॉ. जगदिश वाडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...