आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरातील इजेक्टा ब्लँकेटच्या जतनासाठी या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शासनाकडून अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
लोणार सरोवराच्या विविध भागातील विकासकामांसंदर्भात अनेक वर्षांपासून जतन व संवर्धन बैठका सुरू आहेत. राज्य शासनाकडून विकासकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार विकासकामे सुरू आहेत. याच दरम्यान इजेक्टा ब्लँकेटच्या जतनासाठी जमिनी संपादित करण्यासाठी संबंधित विभागाकडून जलदगतीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
सरोवराच्या दक्षिण व पश्चिम भागातील जवळपास ८६ हेक्टर खासगी जमीन अधिग्रहीत करण्याच्या दृष्टीने भूमि अभिलेख विभागाने मोजणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. यापूर्वी २०२२ मध्ये लोणार सरोवराच्या आतील २२ हेक्टर जमीन शासनाने संपादित करून वन विभागाच्या ताब्यात दिली आहे. लोणार सरोवर विकासाच्या दृष्टीने ३६९ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. निधीही उपलब्ध आहे. परंतु, प्रशासकीय स्तरावर त्या दृष्टीने प्रभावी नियोजन व हालचाली जलदगतीने होत नसल्याने आराखड्याची कामे रखडली आहेत. त्यामुळे दि. १८ डिसेंबर रोजी आयोजित बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जातात, याकडे सरोवरप्रेमी, शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जमीन अधिग्रहणाबाबत आपल्याला मेहकर येथील उपविभागीय कार्यालयात बोलावून म्हणणे जाणून घेण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आपली जमीन शासनाने खरेदी करावी असे मत व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.