आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दखल:विविध मागण्यांसाठी शेतकरी मुंबईकडे रवाना

बुलडाणा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध मागण्यांसाठी व सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल न घेतल्याने हजारो शेतकरी घेऊन ते आज मुंबईच्या दिशेने जलसमाधी आंदोलनासाठी रवाना झाले आहे.

आज २३ नोव्हेंबरला सकाळी सात वाजेपासूनच शेतकऱ्यांची वाहने स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर बुलडाणासमोर जमा झाली होती. हजारो शेतकरी जमा झाल्याने पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक वळवावी लागली. शेतकरी वेगवेगळ्या वाहनाने बुलडाण्यात सकाळपासूनच दाखल होत होते. डफड्यांच्या निनादात आणि घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान, या आंदोलनाची राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे, अशीही माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिल्याचे तुपकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...