आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम:प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हा; वसंतराव राठोड यांचे आवाहन

देऊळगावराजा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगाम २०२२-२३ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी असून, योजना ऐच्छिक आहे. या योजने अंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे. विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी खरीप हंगामासाठी विमा हप्ता दोन टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत विविध जोखमीच्या कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाते.आता दोनच दिवस उरले असून त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी केले आहे.

राज्यात चालू आर्थिक वर्षापासून सन २०२२-२३ पंतप्रधान पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. मात्र या विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणीची नोंद सक्तीची असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. या सर्व अफवा असून पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणीच्या नोंदीची सक्ती नसल्याचा निर्वाळा राज्याचे कृषी विभागाने केला आहे.

शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामातील पिकांचा या योजनेंतर्गत विमा काढण्यासाठी येत्या ३१ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या ई-पीक पाहणी मध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची प्रक्रिया ही येत्या १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू केली जाणार आहे. मात्र केंद्र शासनाने लागू केलेल्या या पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्या बाबतच्या अफवा पसरल्याने, या योजनेतील सहभागाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. त्यामुळ देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देऊळगावराजा येथील तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...