आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:साखर कारखाना ऊस नेत नसल्याने शेतकऱ्याने पेटवला शेतातील फड; सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ येथील घटना

सिंदखेडराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात उभा असलेला ऊस अनेकवेळा सांगून देखील कोणताच कारखाना नेत नाही. येत्या काही दिवसांत पाऊस पडणार असल्याने ऊस तोडणी होणार नाही. त्यामुळे त्रस्त शेतकऱ्याने उभ्या फडाला पेटवून दिल्याची घटना तालुक्‍यातील चांगेफळ येथे मंगळवारी घडली. दिनकर मोगल यांनी एका एकरावरील उसाच्या फडाला त्रस्त होऊन आग लावली. तालुक्यातील चांगेफळ व देवखेड यासह काही ठिकाणी अद्यापही काही शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यांनी नेलेला नाही. मागील काही दिवसांपूर्वी या भागामध्ये ऊस तोड करणाऱ्यांच्या टोळ्या व ऊसतोडणी मशीन आलेली होती. तथापि, या भागातील काही शेतकऱ्यांचा ऊस अद्यापही बाकीच आहे.

कोणत्या कारखान्याशी ऊस नेण्याबाबत मोगल यांनी करार केला होता, ही बाब मात्र स्पष्ट होऊ शकली नाही. कार्यक्षेत्रात कारखाना नसल्याने ऊस उत्पादकांसमोर समस्या उभी आहे. चांगेफळ शिवारात अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली. मात्र, कार्यक्षेत्रात कारखाना नसल्याने ऊस तोडी करणाऱ्या टोळ्या इकडे येणार नाही ही शक्यता लक्षात घेऊन या भागातील काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोड टोळ्यांना मॅनेज करत त्यांचा ऊस कारखान्यांना पाठवलेला आहे. येथील शेतकरी कोणत्याच कारखान्याचे शेअर होल्डर नाहीत. ही बाब देखील या निमित्ताने समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...