आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात यावी

मलकापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील दिवसाचे भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी आज ५ डिसेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. दिवसाचे भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना किमान आठ तास दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

निवेदन देताना शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, गजानन ठोसर, प्रा.कृष्णा मेहसरे, शकील जमादार, समद कुरेशी, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, कामगार सेना शहर प्रमुख सै.वसीम, राम थोरबोले, शहर प्रमुख हरिदास गणबास, युवासेना शहर प्रमुख पवन गरुड, उपशहर प्रमुख सै.यासीन, रामराव तळेकर, विजय झांबरे, इमाम शाह, आकाश बोरले, संतोष बोरले, चाँद चव्हाण, मो.ईसाक तेली यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...