आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ:‘पीएम किसान’ योजनेसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करावे

मानोरा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान किसना सन्मान योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी आधार कार्ड जोडणी करावी, असे आवाहन मानोऱ्याचे तालुका कृषी पर्यवेक्षक आर. व्ही. सवने यांनी केले आहे. ‘पीएम किसान’ योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून, त्यासाठी शेतकऱ्यांना ओटीपी आणि बायोमेट्रिक हे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, एनपीसीएल सिडेड बँक खात्यासोबत आधार नोंदणी केलेली नाही, त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे शासनाने जाहीर केले आहे. ई-केवायसी, आधार जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपूर्वी ती करून घ्यावी, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक सवने यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...