आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:पाण्यात बसून उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा ; शासन दरबारी शेतात साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी

राहेरी बुद्रुक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातील पाण्यासाठी विल्हेवाट लावण्यात यावी, अन्यथा पाण्यात बसून उपोषण करण्यात येईल, असा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज १५ जून रोजी ग्रामपंचायत प्रशासनास दिला आहे. राहेरी बुद्रुक येथील गट क्रमांक ३ ते ६३ मधील शेतात मागील वीस वर्षांपासून गावातील जमा होणारे पावसाचे पाणी साचून २५ ते ३० एकर शेतीचे नुकसान होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अनेक वेळा शासन दरबारी शेतात साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायत कार्यालयास वेळोवेळी निवेदने दिली आहेत. परंतु अद्यापही या पाण्याची विल्हेवाट लावली नाही. त्यामुळे पाण्याची विल्हेवाट न लावल्यास पाण्यात बसून उपोषण करू येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...