आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलडाणा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे कुठल्याही प्रकारचे नुकसान न करता ती जमीन सिंचनाखाली येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक उन्नती होणार असून भविष्यात या भागातील कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही, तसेच टप्प्याटप्प्याने बंधाऱ्यांचे बांधकाम होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. मोताळा तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये जवळपास २३ कोटी ८० लाख रुपये खर्चून सिमेंट साठवण बंधारा बांधकाम करण्याचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते २ एप्रिल रोजी पार पडला.
बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आ.संजय गायकवाड यांनी विकास कामाचा झंझावात सुरू केला असून मतदार संघामध्ये विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. यावेळी आ. गायकवाड म्हणाले की, टप्प्याटप्प्याने बंधाऱ्यांचे बांधकाम होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये १९ बंधाऱ्याचे बांधकाम होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ३५ बंधाऱ्याचे बांधकाम तर तिसऱ्या टप्प्यामध्ये छोटे धरण व पाझर तलावासह जवळपास ११० बंधाऱ्यांचे बांधकाम करून तालुक्यामधील कुठल्याही शेत जमिनीचे नुकसान न करता जवळपास १६० किलोमीटर परिसरामध्ये पाणी साठवण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील भूमिपूजन व लोकार्पण झालेल्या कामांमध्ये खडकी येथे ५० लाख रुपये, खैरखेड येथे १ कोटी रुपये, मोहेगाव येथे १ कोटी रुपये, राजूर येथे १ कोटी रुपये, कोथळी येथे ३ कोटी ५० लाख रुपये, गिरोली येथे १ कोटी रुपये, टाकळी ९० लाख रुपये, रोहिणखेड १ कोटी रुपये राहेरा ८० लाख रुपये उबालखेड ९० लाख रुपये, चावर्दा १ कोटी रुपये, शेलगाव बाजार येथे १ कोटी रुपये, तसेच बोराखडी येथे १ कोटी रुपये या ठिकाणी द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधारा बांधकाम करणे तर तालखेड व महालपिंप्री येथे १ कोटी ८० लक्ष रुपयाची पाणीपुरवठा योजना पुनर्जोडणी व ३ कोटी १५ लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना कामांचा समावेश आहे यावेळी आ. संजय गायकवाड यांच्यासोबत शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी विविध गावांचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तथा विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.