आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण‎:घरासमोरील विद्युत खांब हटवण्यासाठी‎ महावितरण विरोधात उपोषण‎

देऊळगावराजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरासमोर अधिकृतरित्या‎ उभारलेला विद्युत खांब हटवण्यासाठी‎ त्र्यंबकनगरमधील रहिवासी दीपक खराट यांनी‎ महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता‎ कार्यालयासमोर आज, दि. १९ बेमुदत उपोषणास‎ सुरुवात केली. दीपक खराट यांच्या घरासमोर अति‎ उच्च दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी खांब उभा‎ करण्यात आला आहे. त्यावरील तार घरासमोरून‎ गेले आहेत.

त्यांंचे अंतर अत्यंत कमी असून‎ विद्युतप्रवाह अति उच्च दाबाने असल्याने भविष्यात‎ जीवितहानी होण्याची शक्यता आहे. याबाबत खराट‎ यांनी महावितरणकडे अनेकदा तक्रार दिली होती.‎ मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा‎ इशाराही दिला होता. मात्र, महावितरणने दखल न‎ घेतल्याने खराट यांनी उपकार्यकारी अभियंत्यांच्या‎ कार्यालयासमोर आज बेमुदत उपोषण सुरू केले.‎ दरम्यान, शिवसंग्रामचे राजेश इंगळे, जहीर‎ पठाण, शिवसेना शिंदे गटाचे अतिष खराट,‎ सचिन व्यास, अभय दीडहते, छावा संघटनेचे‎ संतोष राजे जाधव यांनी भेट देऊन खराट यांच्या‎ उपोषणास पाठिंबा दिला.‎

बातम्या आणखी आहेत...