आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईसाठी उपोषण

बुलडाणा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देऊळगावराजा येथील खरेदी विक्री संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने हरभरा खरेदीमध्ये व्यापाऱ्यांचा माल घेवून नातेवाइकांचा सातबारा व बँक खाते देवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यामुळे संबंधितावर तत्काळ कारवाई करून संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे, या मागणीसाठी देऊळगावराजा तालुक्यातील सरंबा येथील संजय तेजराव चेके व सामाजिक कार्यकर्ते विकास जनार्दन गवई यांनी सोमवारी दुपारी चार वाजेपासून येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, देऊळगावराजा येथील खरेदी-विक्री संघाचे अधिकारी, कर्मचारी व संचालक मंडळाने काही व्यापाऱ्यांशी आर्थिक संगनमत करून कमी क्षेत्रफळाच्या सातबाऱ्यावर जास्त क्षेत्रफळ दाखवून शेतकऱ्यांच्या नावावर हरभऱ्याची नोंद करून व हा हरभरा व्यापाऱ्यांचे असल्याचे दर्शवून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. या घोटाळ्याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. शिवाय चौकशी अहवाल सुध्दा दिला आहे. परंतु त्यातही बरीचशी माहिती दडवून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे, या मागणीसाठी देऊळगावराजा तालुक्यातील सरंबा येथील संजय तेजराव चेके व सामाजिक कार्यकर्ते विकास जनार्दन गवई यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...