आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमृद्धी महामार्गाचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मेहकर आदी भागात महामार्गावर जल्लोष करण्यात आला. देऊळगाव राजा येथून हा महामार्ग झाला असला तरी शेतकऱ्यांना सुविधा मिळाल्या नसल्याने समृद्धी महामार्गाच्या भिंतीलगत पक्का रस्ता, पूल बांधावा आदी मागण्यांसाठी पळसखेड मलकदेव गावकऱ्यांनी उपोषणास सुरुवात केली होती. मात्र आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेण्यात आले.
या ठिकाणी फक्त दहा फुटच रस्ता तयार करण्यात आला असून शेताकडे जाण्यास रस्ताच नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे. या बाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.
प्रांत अधिकाऱ्यांची भेट उपोषणास उपविभागीय अधिकारी डॉ.भूषण आहिरे यांनी भेट दिली. पळसखेड मलकदेव टोल नाक्याच्या सर्व बाजूला असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भिंतीलगत कच्चा रस्ता सोडला आहे. ते सर्व रस्ते पक्के करा, नाल्यावर पक्के पुल बांधा, रस्ते डांबरीकरण करा या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार असा इशारा पळसखेड मलकदेव गावकऱ्यांनी दिला होता. या उपोषणास माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे यांनी भेट देवून गावकऱ्यांनी चर्चा केली. कायंदे यांनी शासनाने तत्काळ मागण्या मंजूर करावे, अशी मागणी केली होती. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, विश्वास भुतेकर, दामोधर भुतेकर, नामदेव भुतेकर, रामदास भुतेकर, दत्तात्रय उगले, छगन भुतेकर, सुशीला भुतेकर, ज्योती भुतेकर, विमल भुतेकर आदी उपस्थित होते.
समृद्धी महामार्गावर जल्लोष
सिंदखेडराजा|हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होताच दुसरबीड येथे शिवसेना (शिंदे गट) व भाजपच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. समृद्धी महामार्गाच्या टाेल प्लाझाजवळ दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन फटाके फोडले. यावेळी माजी आमदार डॉ. शशीकांत खेडेकर, वैभव देशमुख, प्रसाद कुलकर्णी, टी. टी. शिंपणे, वीरेंद्र देशमुख, छगन खंदारे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.