आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:गौण खनिजाच्या रॉयल्टीसाठी वडार समाजाचे तहसीलसमोर उपोषण

बुलडाणा5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौण खनिजांची रॉयल्टी देण्यात यावी, या मागणीसाठी सुंदरखेड विजयनगर येथील वडार समाज बांधवाच्या वतीने मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार गौण खनिज आराखड्यात समाविष्ट असलेल्या वडार समाजाला माळविहिर येथील गट क्रमांक ५५ मधील ०.८० हेक्टर आर जमिनीतून गौण खनिज काढण्यासाठी रॉयल्टी मिळण्यासाठी व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर कारवाई करण्यासाठी समाज बांधवांनी अनेकदा महसूल, वन विभाग व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. परंतु उपरोक्त अधिकारी आदेशाची अंमलबजावणी न करता वारंवार मार्गदर्शन मागत आहेत. गौण खनिजांची रॉयल्टी मिळत नसल्यामुळे समाजावर उपासमारीची पाळी आली असून मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे वडार समाजाला गौण खनिजांची रॉयल्टी देण्यात यावी, या मागणीसाठी शेषराव चव्हाण यांच्यासह समाज बांधवांनी उपोषणास सुरूवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...