आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:घरकुल नियमाकुल करण्यासाठी उपोषण; घरकुल योजनांपासून जांभरुण येथील लाभार्थी वंचित राहात आहेत

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरकुल नियमाकुल करण्यात यावे, या मागणीसाठी तालुक्यातील जांभरुण येथील लाभार्थ्यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे.

सागवन ग्रामपंचायत हद्दीत येणारे जांभरुण हे गाव स्वातंत्र्य काळापासून ई क्लास अतिक्रमित जागेवर वसलेले आहे. यापुर्वी गावातील बऱ्याच लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे. परंतु सध्या स्थितीत ज्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत, त्यांना घरकुल नियमाकुल असल्याचे पत्र मागितला जात आहे. वास्तविक पाहता घरकुल नियमाकुल करण्यासाठी जांभरुण येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा प्रशासनाकडे अर्ज दाखल केले आहेत. परंतु अद्यापही त्यांचे घरकुल नियमाकुल करण्यात आले नाही. त्यामुळे गोरगरिबांसाठी शासन राबवत असलेल्या घरकुल योजनांपासून जांभरुण येथील लाभार्थी वंचित राहात आहेत.

त्यामुळे त्याचे घरकुल नियमाकुल करण्यात यावे, या मागणीसाठी सागवनचे माजी सरपंच रवींद्र भाकरे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनीष बोरकर यांच्या नेतृत्वात शीला आराख, रामेश्वर माळी, किरण हिवाळे, जयश्री सुरूशे, चंदा खिल्लारे, सुमन जाधव, शालू खंडागळे व प्रमिला खरे या लाभार्थ्यांनी आजपासून उपोषणास सुरूवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...