आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:डोणगावात हजला जाणाऱ्या भाविकांचा सत्कार; अमन सोशल ग्रुप च्या वतीने सत्कार

डोणगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम बांधवाचे पवित्र तिर्थक्षेत्र असलेल्या मक्का मदिना येथे जाणाऱ्या भाविकांचा डोणगाव येथे अमन सोशल ग्रुप च्या वतीने सत्कार करून त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या.

जानेफळ येथील शेख मेहबूब अतार, मेहकर येथील शेख बन्नु अतार, शेख अयुब हे हज उमरा येथे जात असता डोणगाव येथे अमन सोशल ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी अमन सोशल ग्रुपचे अध्यक्ष अबरार खान मिल्ली, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जून वानखेडे, अकबर खान पठाण, समाज सेवक माजी सरपंच अरुण धांडे यांच्यासह मुस्लिम बांधवांनी यात्रेकरूंना पुष्पहार व अरबी रुमाल देऊन निरोप दिला.

यावेळी राजू टाले, बशीर अहमद साहब, हाजी इब्राहिम, शेख अहमद, आतार अब्बासखान मिल्ली, संतोष नेमाडे, जीनत अल, अश्फाक पठाण, जमीर आतार, फिरोज आतार, फैसल खान, फरहान खान, अर्जील खान, अयुब खान पठाण आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...