आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजासाठी प्राधान्य:हज यात्रा पूर्ण करणाऱ्या मौलानांचा सत्कार ; सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न

फत्तेपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हज यात्रा पूर्ण करून आलेल्या भोकरदन शहरातील सर्व हाजींचा व मौलानांचा माजी आ. चंद्रकांत दानवे व युवा नेते सुधाकर दानवे यांच्या हस्ते रविवारी सत्कार करण्यात आला.या वेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे, हाफिज रियाज, हाफिज कारी इम्रान, हाफिज मौलाना हासन आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार चंद्रकांत दानवे म्हणाले की, भोकरदन शहरामध्ये बहुसंख्य मुस्लिम समाज आहे. आपल्या समाजाने आता खऱ्या अर्थाने एकत्र येऊन समाजाला तसेच समाजातील व्यक्तीला प्राधान्य देऊन सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी आमदार असताना आपल्या समाजासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. मग ते भोकरदन, जाफराबाद शहरामध्ये असो किंवा मतदारसंघातील कोणत्याही गावात असो.

तसेच आपण सर्व हाजी, मौलाना खूप पुण्यवान लोक आहात. त्यामुळे आपल्या आशीर्वादाची आम्हाला आवश्यकता असून आपण मनोभावे आम्हाला सहकार्य कराल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी हाजी नसीबखाँ, हाजी मौलाना हारुण, हाफिज शफिक, छोटू शेठ, हाजी अजीस पार्टी, शब्बीर कुरेशी, डॉ. शेख, प्रा. नईम कादरी, नसीम पठाण, कदीर बापू, अजहर शहा, अब्दुल रऊफ भाई, शमीमभाई मिर्झा, हामदू चाऊस, हाजी मुजीब, डॉ. सलीम, सय्यद कुदरत अली, हाजी सय्यद अजिम, हाजी मझर शेठ, हाजी शेख नईम, हाजी शेख रऊफ, हाजी शेख शफिक, सय्यद अश्पाक, हाजी ताज साहेब, सायब मामू, एजाज शेठ, शेख रहेमानभाई, इरफान पटेल, इरफान शहा, साबेर शहा, शहा, मुमताज मदनी, इसरार पठाण, सय्यद आरेफ आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...