आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऐन रब्बीचा हंगाम सुरू असून शेतकरी शेतपिकाच्या कामात गुंतला आहे. अशातच रासायनिक खतांचा पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्यांनी खतांचे भाव वाढवले आहेत. त्यामुळे शेतकरी आता तर अतिशय हवालदिल झाला आहे.मागील ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे झालेले खरीप पिकाचे नुकसान, शेत मालाचे पडलेले भाव, दिवसागणिक वाढत जाणारी महागाई, कपाशीवर लाल्याचे तर सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव यासह इतर संकटामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची रब्बी पिकावर मदार होती. आता पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी केली आहे.
परंतु ही पिके बहरत असतानाच विविध कंपन्यांनी रासायनिक खताच्या किमतीत सरासरी शंभर ते दोनशे रुपयांनी भाव वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. तर दुसरीकडे खताच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यास सरकारही अपयशी ठरत असल्यामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न रब्बी उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. नाइलाज असल्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराने खताची खरेदी करावी लागत आहे.
यंदा उशिरा सुरू झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी जवळपास सात लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली होती. परंतु ही पेरणी होत नाही तोच पावसाने पंधरा ते वीस दिवसाची दडी मारली. त्यामुळे काही तालुक्यात शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर उशिरा का होईना पावसाने सुरूवात करून दिली. परंतु ही पिके काढणीवर येत नाही तोच, मागील ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने सुरूवात करून दिली.
या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकाचे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्च सुध्दा निघाला नाही. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला होता. त्यामुळे खरिपाची तुट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांची रब्बी पिकावर मदार होती. यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे व सिंचन प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे आतापर्यंत जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे.
परंतु यावर्षी विविध कंपन्यांनी रासायनिक खताच्या किमतीत सरासरी शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ करून शेतकऱ्यांना आर्थिक खाईत लोटले आहे. प्रत्येक खताच्या बॅग मागे वाढ करण्यात आली आहे. खताच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यास सरकारही अपयशी ठरल्याने न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न रब्बी उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता खताच्या भाव वाढीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे.
यंदा असलेले रासायनिक खताचे भाव
यदा महाधन खताचे भाव १ हजार ४२५ रुपये आहेत. तर जय किसान १३६० रुपये, आरसीएफ २०-२०-०१३ १४७०, सरदार १३६० तर १०-२६-२६ चे भाव १ हजार ४७० रुपये प्रति बॅग एवढे भाव आहेत. तर डीएपी खताचे भाव जैसे थे ठेवण्यात आले आहेत.
मागील वर्षाचे खताचे भाव
मागील वर्षी महाधन खताचे भाव १३५० रुपये होते. तर जय किसान १४०० रुपये, आरसीएफ ९७५ व सरदार या खताचे १ हजार २२५ रुपये प्रति बॅग एवढे भाव होते.
खताच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे
मागील ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुध्दा निघाला नाही. त्यातच अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची तुटपुंजी मदत मिळाली आहे. अशा परिस्थीतीत शासनाने खताच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे. -विजय पाटील, शेतकरी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.