आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळा सुरु झाला असून त्याकरता शेतकऱ्यांना बाजारपेठेत आवश्यक खते व बियाणे उपलब्ध झाले आहे. खामगाव शहरात सरासरी १ रेक खत,७ रेक सिमेंट व ४ रेक एफ.सी.आय दर महिन्याला रेल्वेने येते. तेथून ते ट्रकने संपूर्ण जिल्ह्यातील तेरा ही तालुक्यांमध्ये पाठवले जाते. खामगाव रेल्वे स्थानक हे खूप जुने रेल्वे स्थानक आहे. इंग्रजाच्या काळापासून १८७० मध्ये खामगाव येथून १३ किलोमीटरचा रेल्वे मार्ग टाकण्यात आला. खामगाव रेल्वे स्थानकावर एक मोठा धक्का (रेल्वे गुड्स शेड यार्ड) आहे, तेथून शेकडो मजूर ट्रकमध्ये रेल्वेतून आलेला माल भरून संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवतात.
भारतातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाण्यापर्यंत धावली. मे १८५४ पर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेची मुंबई-ठाणे मार्गाला कल्याण पर्यंत वाढविण्यात आली होती व भुसावळ रेल्वे स्थानक १८६० मध्ये स्थापन करण्यात आले होते. १८६७ मध्ये जीआयपीआर शाखा मार्गला नागपुर पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर सन १९८९-९० मध्ये नांदुरा-बडनेरा सेक्टरमध्ये रेल्वेचे विद्युतीकरण करण्यात आले होते. खामगावमधील कापसाचा व्यापार १८२० च्या सुमारास सुरू झाला, व्यापार सुरु झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली त्यामध्ये तूप, कच्चे सूत, कापूस यांचा व्यापार सुरू केला.
विशेषतः कापसाचे चांगले व्यापारी आणि सर्वसाधारणपणे इतर व्यापार खामगावात स्थिरावले. १८७० मध्ये या शहराला भारतातील सर्वात मोठे कॉटन मार्ट असे संबोधले जात असे शहरात आजही कापसाचा बराच व्यापार चालतो. येथे २२ जिनिंग व प्रेसिंग कारखाने होते. या जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमुळे कापसाचे गठाणी तयार करून खामगाव येथून जलंब रेल्वे मार्गाने मुंबई पाठविले जात होते व तेथून कापसाच्या गठाणी समुद्रामार्गे जहाजाने लंडन येथे रवाना करण्यात येत होते. म्हणूनच खामगाव जलंब १३ किमी रेल्वे लाईन टाकून मुंबईत कापूस पाठवण्याचे काम करत असत. या काळात या रेल्वेलाइनवर आधी ७ बोगीची ट्रेन धावत होती मध्यंतरी काळात या रेल्वे मार्गावर रेल्वे बस आणि आता ३ बोगीची ट्रेन चालवल्या जात आहेत. हा प्लॅटफॉर्म १८७० साली बांधण्यात आला. खामगावला रेल्वे गुड्स शेड यार्डची पाहणी करण्यासाठी १० मे २०२२ ला मध्य रेल्वे मंत्रालयाची पाच सदस्यीय चमू यांनी खामगाव रेल्वे स्टेशनला भेट देत निरीक्षण केले होते. नवीन प्लॅटफॉर्म आणि रेल्वे गुड्स यार्ड बांधण्यासाठी १९ कोटी मंजूर झाले आहेत, मात्र निधीअभावी बांधकाम सुरू होऊ शकले नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.