आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ठ खेळाडूंचा सत्कार:समन्वय साधून सण, उत्सव साजरा करावा : आ. संजय कुटे

जळगाव जामोद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात जनतेने साथ देऊन एकमेकाला मदत केली. तिच आपुलकी उत्तरोत्तर वाढत गेली पाहिजे, अशी मानसिकता ठेवावी. काही विकृत शक्ती डोके वर काढतात. परंतु आता जनता समजदार झाली आहे. जनता विसरते म्हणून उजळणी करावी लागते. मागील दोन अडीच वर्षात दाबलेले कलागुण उफाळून येतील. उत्साह मरता कामा नये. परंतु जनता व पोलिस प्रशासनाचा समन्वय साधून सण, उत्सव साजरा करावा, असे आवाहन आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले.

सोनाळा पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. बैठकीला पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, एसडीपीओ अभिनव त्यागी, श्रीमती खाडे, महसूलच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार शीतल सोलाट, ठाणेदार उलेमाले, सोनाळ्याचे ठाणेदार सुनील आंबुलकर यांची उपस्थिती होती. सण, उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील, अशी ग्वाही रिपाइंचे तालुकाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी दिली. त्यानंतर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे, मौलवी खलेलुल रहेमान व वरवट बकाल येथील नवयुवक गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी प्रशासन व जनता यांचा समन्वय राखला जाईल, अशी हमी दिली. या वेळी पोलिस अधीक्षक चावरिया, अपर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त व एसडीओ वैशाली देवकर यांनी ध्वनिप्रदूषण राखून गणेश मंडळातर्फे समाज हिताच्या दृष्टीने आरोग्य, रक्तदान, नेत्ररोग शिबिर, गुणवंतांसह उत्कृष्ठ खेळाडूंचा सत्कार अशी विधायक कामे करावी, असे सांगितले. प्रास्ताविक ठाणेदार सुनील आंबुलकर यांनी केले, तर सूत्रसंचालन एपीआय कैलास चौधरी केले. आभार ठाणेदार उलेमाले यांनी मानले. कार्यक्रमासाठी एपीआय सागर भास्कर, पीएसआय आवारे, अमोल वनारे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...