आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत स्वाभिमानी पक्षातर्फे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आक्रोश आंदोलन छेडण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कांद्याचे भाव गडगडले आहे. सरासरी चांगल्या कांद्याला चारशे ते सहाशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतात ठेवला आहे. भाव कमी मिळत असल्याने त्यांची वाहतूक करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. राज्य शासन दरवर्षी नाफेड मार्फत कांदा खरेदी करते परंतु त्याचा प्रत्यक्ष फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना होत नाही. कारण कांदा खरेदीचे भरपूर प्रयोग यापूर्वी झाले परंतु सगळीकडच्या भ्रष्ट यंत्रणेने ते फस्त केले आहेत. मध्य प्रदेशातील भावांवर ही योजना बुडाली. कारण जो कांदा विकला तोच खरेदी करुन पुन्हा दुसऱ्या केंद्रावर नेवून विकला. या योजनेमध्ये करोडो रूपयांचा भ्रष्टाचार झाला.
हा प्रयोग केल्या पेक्षा प्रत्येक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पेऱ्याची नोंद झाली आहे. किंवा ज्यांची नोंद राहिली आहे. तेथे प्रत्यक्ष पटवारी पाठवून नेांद करुन द्याव्या ज्या प्रमाणात पेरा असेल त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, एकरी १०० क्विंटल व प्रतिक्विंटल २०० रुपये प्रमाणे नुकसान भरपाई दिलासा शेतकऱ्यांला मिळावी, कारण लागवड, खते, बियाणे व काढणीसाठी लागलेल्या खर्चाची मदत होईल याबाबत तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे स्वाभिमानी पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य गिरधर देशमुख, तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण काकडे, शेगाव तालुकाध्यक्ष अनिल पाटील, प्रसिद्धी प्रमुख सोपान खंडारे, गजानन धंदरे, संजू जेऊघाले आदींसहित अनेकांच्या स्वाक्षरी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.