आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पन्नास वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जबाजारीपणाला कंटाळून पन्नास वर्षीय शेतकऱ्याने विषप्राशन केल्याची घटना भोरटेक येथे शनिवारी १७ डिसेंबर रोजी घडली होती. या शेतकऱ्यावर उपचार सुरु असताना त्यांचा सोमवारी बुलडाणा येथील रुग्णालयात मृत्यू झाला.

बारसू परशराम गायकवाड असे शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील भोरटेक येथील अल्पभूधारक शेतकरी बारसू परशराम गायकवाड (५०) यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास विष प्राशन केले होते. त्यांना अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर सोमवारी १९ डिसेंबर रोजी सात वाजेच्या सुमारास उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली. शेतकरी बारसु गायकवाड यांच्यावर बँक व खासगी कर्ज होते.

बातम्या आणखी आहेत...