आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:बावनबीर येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू, तीन जखमी, पाच जणांना अटक

संग्रामपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बावनबीर येथे रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या एकाच समाजाच्या दोन गटात जुन्या वादातून तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत घातक शस्त्राचा वापर करण्यात आला आहे. या हाणामारीत धारदार चाकू भोसकल्याने एका सत्तावीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचारी व समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. परंतु या आवाहनाला दोन्ही गटाने जुमानले नाही. या हाणामारीत शेख रफीक शेख गणी यास चाकूने भोसकण्यात आले. चाकूचा घाव वर्मी लागल्याने त्याचा जागीच मुत्यू झाला आहे.

तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे या ठिकाणी प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी शेगाव येथे हलवण्यात आले आहे. तर शेख रफीक शेख गणी यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनाळा पोलिसांनी दहा ते बारा संशयित विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. संशयित म्हणून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...