आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:अंत्री शिवारात जुन्या वादातून दोन गटात हाणामारी ; न जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना आज ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील अंत्री शिवारात घडली. प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून एका गटातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटातील तीन जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील अंत्री येथील अक्षय मधुकर जवरे हा युवक आज ६ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अंत्री शिवारातील शेतातून घरी जात असतांना जुन्या वादातून नीळकंठ सोपान रामेकर याने अक्षय जवरे यास पकडले. तर शत्रुघ्न सोपान रामेकर, संतोष अरुण रामेकर यांनी त्यास काठीने मारहाण केली. त्यावेळी युवराज अरुण रामेकर हा गावातून हातात तलवार घेऊन आला व नीळकंठ रामेकर याच्या हातात तलवार देऊन म्हणाला की, त्याला कापून टाक असे म्हटले. तेव्हा अक्षय जवरे हा पळून जात असताना नीळकंठ रामेकर याने अक्षय याच्या पाठीवर मारून जखमी केले व चौघांनी जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणी अक्षय जवरे याने बोराखेडी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नीळकंठ रामेकर, शत्रुघ्न रामेकर, संतोष रामेकर आणी युवराज रामेकर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या गटातील शत्रुघ्न रामेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची वहिनी शेतात जेवणाचा डबा घेऊन येत असतांना त्यांना धक्का लागल्यामुळे अक्षय जवरे, शिवा जवरे, मधुकर जवरे यांच्याशी शत्रुघ्न रामेकर यांचा वाद झाले असून तिघांनी शत्रुघ्न रामेकर यास मारहाण केली. या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अदखलपात्र नोंद केली आहे. पुढील तपास नापोका संजय गोरे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...