आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:जुन्या वादातून सावरगाव जहांगीर येथे दोन गटात हाणामारी, दोन्ही गटातील अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मोताळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २२ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील सावरगाव जहांगीर येथे घडली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील अकरा जणांविरुद्ध धामणगाव बढे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावरगाव जहांगीर येथील रोशन सरदार हे २२ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास शौचास जात असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून कडू सुरडकर, दिनकर सुरडकर, समाधान सुरडकर, सुंदराबाई सुरडकर, जिजाबाई सुरडकर, मीराबाई सुरडकर यांनी त्यांच्यासोबत वाद करून अश्लील शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या गटातील नंदाबाई सुरडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २२ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्या गावातून मजुरीचे पैसे घेऊन घराकडे येत असताना त्यांचे जेठ कडू सुरडकर, रोशन सरदार यांचे भांडण सुरू होते. नंदाबाई त्या ठिकाणी गेल्या असता अनुसया सरदार, माधुरी सरदार, रेशमा सरदार व सुरेश सरदार यांनी नंदाबाई सुरडकर यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून शिविगाळ करून मारहाण केली. तसेच रोशन सरदार व सुरेश सरदार या दोघांनी साडी ओढून वाईट उद्देशाने शरीरास स्पर्श केला. भांडण सोडण्यासाठी आले असता त्यांनी मुलीला चापटबुक्क्यांनी मारहाण केली. तर रोशन सरदार याने जेठाच्या पायावर दगड मारून जखमी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी रोशन सरदार, अनुसयाबाई सरदार, माधुरीबाई सरदार, रेशमाबाई सरदार, सुरेश सरदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास धामणगाव बढेचे ठाणेदार चंद्रकांत ममताबादे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ पोहेकॉ प्रशांत पाटील हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...