आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता हायस्कूल:बांधावर हाणामारी; अंजनी येथील जनता हायस्कूलच्या अध्यक्षावर गुन्हा

मेहकर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातील नालीच्या पाण्याच्या वादातून शेताच्या बांधावर १४ जून रोजी झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळकृष्ण राठी व प्रदीप गायकवाड यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत मेहकर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम अंजनी खुर्द शिवारात बाळकृष्ण राठी यांची गट नंबर २२९ मध्ये जमीन आहे तर त्याच शेजारी २२८ गट नंबर मध्ये प्रदीप रामचंद्र गायकवाड यांची शेती आहे सदर शेती लगत अंजनी वालूर ही शिव असल्यामुळे या ठिकाणी वालूर शिवारातील हजारो एकर शेतातील पावसाचे पाणी पंचगंगा नदीच्या दिशेने वाहत येते परंतु बाळकृष्ण राठी यांनी शिव लगत असलेल्या नाली वर माती टाकल्यामुळे सदर पाणी हे प्रदीप रामचंद्र गायकवाड यांच्या शेतात शिरत होते त्यामुळे प्रदीप गायकवाड हे बाळकृष्ण राठी यांना सरकारी शिव लगत असलेल्या नाली वर जेसीबीच्या साह्याने माती का टाकली असे विचारण्यास गेले असता सदर नाली पूर्वीपासून आहे असे सांगत असताना वाद उपस्थित झाला. यामध्ये प्रदीप गायकवाड व बाळकृष्ण राठी यांच्यात हाणामारी झाल्यामुळे दोघांच्याही परस्पर तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप रामचंद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरून बाळकृष्ण रामकृष्ण राठी, सुमित बाळकृष्ण राठी, जया बाळकृष्ण राठी, शेषराव उद्धवराव ठाकूर यांच्यावर तर बाळकृष्ण राठी यांच्या तक्रारीवरून प्रदीप रामचंद्र गायकवाड व वंदना प्रदीप गायकवाड यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...