आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेरी भाषेत उल्लेख:राज्यपालांवर गुन्हा दाखल करा

देऊळगावराजा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत एकेरी भाषेत उल्लेख करून अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा व तसेच भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत शिवसंग्रामच्या नेतृत्वात सर्व पक्षीय युवकांच्या वतीने निषेध व्यक्त करत जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे यांच्या नेतृत्वात बस स्थानक चौकात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी ठाणेदार यांच्यामार्फत जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसंग्रामचे राजेश इंगळे, जहीर खान पठाण, अजमत खान, खरेदी विक्री संघाचे संचालक बद्री शिंदे, राष्ट्रवादी युवकचे नीलेश गीते, युवा सेनेचे अतिश खराट, आम आदमीचे राजाराम खांडेभराड, मंगेश तिडके, मनसेचे बंडू डोळस यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...