आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:‘भाजपच्या नुपूर शर्मावर गुन्हा दाखल करा’ ; तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी

मोताळा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका न्यूज चॅनलवर डेबिट करताना इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरून मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने १० जून रोजी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी एका न्यूज चॅनलवर डेबिट करतांना इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आहेत. ही बाब गंभीर आहे. त्यांच्या या कृतीमुळे मुस्लिम समाजात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे नुपूर शर्मावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हुसेन कुरेशी, मोईन अख्तर, शे. रफिक, शाहीद कुरेशी, शे. अयुब शे. कय्युम, शे. नईम शे. मुनीर, शे. साजीद शे. सुपडू, शे. समीर, आसिफ कुरेशी, शे. सलीम मेम्बर, चांद शाह, मुश्ताक शाह यांच्यासह मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...