आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:रेशनच्या तांदळाची साठवणूक केल्या प्रकरणी नांदुरा येथील पांडुरंग लांडे विरुद्ध गुन्हा दाखल

नांदुरा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातील टिनशेड मध्ये अवैधरीत्या तांदळाची साठवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी पांडुरंग लांडे याच्या विरुध्द बुधवारी रात्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील बालाजी प्लॉट मधील एका टिनशेड मध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती खामगाव अप्पर पोलिस अधीक्षक श्रावण दत्त यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरून पथकाने २८ मे च्या रात्री उपरोक्त ठिकाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन धाड टाकली. त्यावेळी टिनशेड मध्ये १७५ क्विंटल तांदूळ आढळून आला. हा तांदुळ रेशनचा असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी पंचनामा करून पुढील कारवाईसाठी हे प्रकरण नांदुरा तहसीलदार यांच्याकडे वर्ग केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ८ जूनच्या रात्री नांदुरा पोलिस ठाण्यात प्रभारी पुरवठा निरीक्षक मुरलीधर सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून आरोपी पांडुरंग लांडे याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या भागात तांदळाची शेती होत नाही, असे असताना हा तांदूळ आला कोठून, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...