आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी कॉम्प्लेक्सचे प्रकरण:माजी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, ठेकेदारावर गुन्हा दाखल ; सात वर्षांच्या चौकशीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

बुलडाणा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहकर नगर पालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष कासम पिरू गवळी तसेच यश कन्स्ट्रक्शन कंपनीने संगनमताने नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर अवैध बांधकाम करून केलेल्या भ्रष्टाचार संबंधाने दाखल झालेल्या तक्रारीच्या चौकशीच्या अंती गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून बेकायदेशीर मार्गाने मालमत्ता स्वतःच्या उपयोगात आणली, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

शासनाची परवानगी नसतांना मेहकर नगराध्यक्ष व यश कंस्ट्रक्शन कंपनीने संगनमत करुन नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर अवैध बांधकाम करुन केलेल्या भ्रष्टाचारासंबंधाने व त्या अनुषंगिक तक्रारी महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्याकडे केल्या होत्या. प्राप्त तक्रार अर्जा संबंधाने उघड चौकशी करुन अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश महासंचालक मुंबई यांनी दिले होते.सात वर्षाच्या प्रदीर्घ चौकशीनंतर बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज १८ जून रोजी गुन्हे दाखल करण्यात आले.मेहकर नगर परिषद व शासनाच्या आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी अहमद शहा सबदर शहा, रा. रेहमत नगर, मेहकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. लाचलुचपत महासंचालकांच्या (मुंबई) यांनी दिलेल्या चौकशी आदेशानंतर बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक शंकरलाल काब्रा, मनीष लढ्ढा, अशोक हेडा, उदय सोनी व सलीम गवळी यांनी मेहकर नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष कासम पिरू गवळी, मुख्याधिकारी तानाजी घोलप व मुख्य लिपिक पवन भादुपोता यांच्यासोबत गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचून बेकायदेशीर मार्गाने मेहकर नगर परिषदेची मालमत्ता स्वतःचे उपयोगात आणली व त्याद्वारे मेहकर नगर परिषद व शासनाचे आर्थिक नुकसान करुन स्वतःचा आर्थिक लाभ करुन घेतला. असे चौकशीअंती सिद्ध झाल्याने बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तसा हा अहवाल महासंचालक मुंबई यांना पाठवला. महासंचालक यांच्या आदेशानंतर मेहकरचे तत्कालीन नगराध्यक्ष कासम पिरू गवळी शंकरलाल काब्रा, मनीष लढ्ढा, अशोक हेडा, उदय सोनी व सलीम गवळी, तत्कालीन मुख्याधिकारी तानाजी घोलप, मुख्य लिपिक पवन भादुपोता त्यांच्याविरूद्ध शनिवार १८ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक सचिन इंगळे यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास विशाल गायकवाड पोलीस अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, अरुण सावंत, अप्पर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे, अप्पर पोलिस अधीक्षक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती तसेच संजय चौधरी, पोलिस उपअधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन इंगळे, पोलिस निरीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...