आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुका काँग्रेसच्या वतीने येथील बस स्थानक चौकात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर झालेल्या ईडी चौकशी विरोधात जेल भरो आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ईडीची नोटीस येऊन त्यांची ईडी मार्फत चौकशी केली. त्याचा निषेध म्हणून तालुका काँग्रेसच्या वतीने आज येथील बसस्थानक चौकात जेल भरो आंदोलन केले. आंदोलना दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. केंद्रात मोदी सरकार आले तेव्हापासून विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात ईडीची चौकशी लावून त्यांच्यावर कारवाई होत आहे. परंतु एकाही भाजपच्या नेत्याविरोधात ईडी मार्फत चौकशी केली नाही. त्यामुळे ईडी ही संस्था केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, शे. सलीम चुनेवाले, शे. आसिफ शे. हरून, मिलिंद जैस्वाल, विजय सुरडकर, रवी पाटील, एकनाथ खर्चे, प्रकाश बस्सी, डॉ. अनिस, मंजूर भाई, अरविंद पाटील, आबीद कुरेशी, उत्तम वैराळकर, शे. शरीफ, स्वप्नील नारखेडे, प्रणवसिंग परमार, साहेबराव डोंगरे, महेंद्र गवई, किसना पाटील, बाळू पाटील, गणेश पाटील, तुळशीराम नाईक, विजयसिंग राजपूत, कैलास गवई, योगेश महाजन, सुरेश इंगळे, सोनू कुळे, विलास पाटील, ज्ञानेश्वर दिवाणे, उखा चव्हाण, प्रणव ठाकूर, शिवाजी हरमकार, गणेश पाटील, ईसा शहा, अभिजीत देशमुख यांनी सहभाग घेतला होता. आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना बोराखेडी पोलिसांनी स्थानबद्ध केले. पीएसआय अशोक रोकडे यांच्या नेतृत्वात बोराखेडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.