आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांत नाराजी:पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; 15 प्रभाग तर वॉर्डांची संख्या 30 ; मतदार संख्येत वाढ

बुलडाणा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा नगर पालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली असून काही हरकती विचारात तर काहींना विचारात घेण्यात आले नाही. अशी कुरबूर ऐकण्यात येत आहे. परंतु, या नगर पालिका निवडणुकीत एकूण लोकसंख्या ही २०११ च्या जनगणनेनुसारच ग्राह्य धरण्यात आली आहे. ही संख्या ६७ हजार ४३१ इतकी असून यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या १२३४२ इतकी तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १५६८ इतकी आहे. एकूण पंधरा प्रभाग राहणार असून वॉर्डाची संख्या ३० इतकी आहे. त्यामुळे आता मतदार संख्या आता वाढणार आहे. आयुक्तांनी प्रभाग रचनेला मंजुरी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी, या प्रभाग रचनेवर अंतिम हात फिरवून त्यावर स्वाक्षरी केली. या प्रभाग रचना आता त्या-त्या नगर पालिकांना पाठवण्यात आली आहे. मात्र आता ज्यांना प्रभाग रचनेवर च्या आक्षेपावर काहीही निर्णय झालेला नाही. जैसे थेच राहिली आहे. त्यांना उच्च न्यायालयात धाव घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी आज प्रभाग रचनेचा अंदाज घेऊन उच्च न्यायालयात जावे की नाही, हा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील आठ नगर पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता अधिक आहे. त्या दृष्टीने आता इच्छुकांनी आपल्या प्रभाग रचना कोठून कुठपर्यंत आहे. याचा अभ्यास करणे सुरू आहे.

प्रभाग क्रमांक ९ व इतर : मच्छी ले आऊट, जयस्वाल ले आऊट, मुठ्ठे ले आऊट, प्रभाग क्रमांक १० मध्ये इंदिरा नगर, विष्णु वाडी, जोशी ले आऊट, प्रभाग क्रमांक ११ मध्ये सुवर्ण नगर, बस स्थानक, जांभरुण रोड परिसर, काळेचा वाडा, छाजेड हॉस्पिटल परिसर, प्रभाग १२ चैतन्यवाडी, लांडे ले आऊट, प्रभाग १३ मिलिंद नगर, सावित्रीबाई फुले नगर, जगदंबा नगर, प्रभाग १४ एकता नगर, केशव नगर, महावीर नगर, सरस्वती नगर, लक्ष्मी नगर, अष्टविनायक नगर, प्रभाग १५ लहाने ले आऊट, राम नगर, छत्रपती नगर

शहरातील काही प्रभाग असे: प्रभाग क्रमांक २ मध्ये मिर्झा नगर, प्रभाग क्रमांक ३ मध्ये क्रांती नगर, तेलगू नगर, इक्बाल नगर काही भाग, प्रभाग क्रमांक ४ मध्ये जोहर नगर, इक्बाल नगर काही भाग. प्रभाग क्रमांक ६ मध्ये भडेच ले आऊट, आंबेडकर नगर, कैकाडी पुरा, प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिवाजी नगर, मिल्ट्री प्लॉट, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, भिलवाडा, प्रभाग क्रमांक ८ मध्ये मुठ्ठे ले आऊट, सोळंकी ले आऊट, राऊतवाडी, केदार नगर, गुरुकृपा नगर, देशपांडे ले आऊट.

प्रभाग क्रमांक १ गणेश नगर, चंद्रमणी नगर, एस.टी. वर्क शॉप, कऱ्हाळे ले आऊट, गुलाबचंद नगर, आयएमए हॉल, हिरो होंडा शो रुम, मोगू महाराज गल्ली, व्हरायटी क्लॉथ, भीमनगर मधील वाचनालय व समाज मंदिर, मुस्लिम कब्रस्थान.

बातम्या आणखी आहेत...