आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार‎:अखेर‘तो’ प्लास्टिक कचरा जाळला‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांपूर्वी शहरातील मलकापूर‎ रोडवरील निसर्गरम्य अशा व्ह्यू पॉइंटवर‎ अज्ञाताने मोठ्या प्रमाणात‎ प्लास्टिकचा कचरा आणून टाकला‎ होता. याबाबत शहरातील‎ पर्यावणप्रेमींनी सोशल मीडियाच्या‎ माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त करत वन‎ विभागाला कचरा उचलण्याचे‎ आवाहन केले होते. परंतु हा कचरा‎ उचलण्यात आला नाही किंवा‎ जाळण्यात आला आहे. त्यामुळे‎ बुधवारी पर्यावरण मित्रांनी सकाळीच‎ एकत्र येत हा कचरा जमा करुन व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जाळून गांधीगिरी केली.‎

पर्यावरण ही सर्वांची जबाबदारी‎ समजून सगळ्यांनी काळजी घेण्याची‎ गरज आहे. याच उद्देशाने येथील‎ पर्यावरण प्रेमी प्रदीप डांगे, अनु माकोने,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नितीन राऊत, संजय अहीर यांच्यासह‎ पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकांनी‎ एकत्र येत या परिसरातील सर्व‎ प्लास्टिकचा कचरा जमा करत तो‎ जाळून टाकला.‎

बातम्या आणखी आहेत...