आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेस्क बेंच:अखेर नगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना बसायला मिळाले बाकडे

मेहकर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगा आमचा काय गुन्हा.. आम्हाला शाळेत बसायला बाकडा का नाही, अशा आशयाचे वृत्त दिव्य मराठी ने २८ जुलै रोजी प्रसिद्ध करुन नगर पालिका शाळेतील वास्तव मांडले होते. याची दखल प्रशासकीय पातळीवर जरी घेतली गेली नसली तरी राजकीय पातळीवर आमदार संजय रायमूलकर व शिवसेनेच्या शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुरेशतात्या वाळुकर यांनी घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना बारा लाख रुपयांचे चारशे डेस्क बेंच देण्याचा संकल्प केला.

नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क बेंच होते तर काहींना नव्हते. याची दखल दिव्य मराठीने घेतल्यानंतर आज आमदार डॉ संजय रायमूलकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये डेस्क बेंच वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आमदार संजय रायमूलकर तर अध्यक्षस्थानी तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर, तहसीलदार डॉ. संजय गरकल, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयचंद बाठीया, रविराज रहाटे, भूषण घोडे, वैभव सावजी, समाधान साबळे, तौफिक कुरेशी, सिकंदर मौलाना, प्रशांत साबळे, अक्काबाई गायकवाड मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षिका मुख्याध्यापक या कार्यक्रमासाठी हजर होते. आमदार रायमूलकर यांनी आपला वाढदिवस या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सोबत घालवला. या विद्यार्थ्यांना त्यांनी चॉकलेटचे वाटप केले.

मानले दिव्य मराठीचे आभार
अनेक वर्षां पासून प्रलंबित असलेला विषय दैनिक दिव्य मराठी ने प्रकाशित केल्यानंतर लोक प्रतिनिधींना त्याची दखल घ्यावी वाटली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता बसण्याची व्यवस्था झाल्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांनी दैनिक दिव्य मराठीचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...