आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील चिखली रोडवर असलेल्या चांडक लाइफ इन्शुरन्सच्या कार्यालयाला शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कार्यालयातील लॅपटॉप, प्रिंटर, फर्निचर, एसी, कागदपत्रे यासह जवळपास तीन लाख रुपयांच्या रोकडसह अंदाजे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. राधेश्याम चांडक यांच्या निवास स्थानाला लागूनच चांडक लाइफ इन्शुरन्सची कार्यालय आहे.
कार्यालयात कामकाज सुरू असताना एसी मशिनमध्ये शॉर्टसर्किट होवून अचानक आगीचा भडका उडाला. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी कर्मचारी कार्यालयाबाहेर पडले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवळपास ४५ मिनिटे पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. परंतु, तोपर्यंत आगीत कार्यालयातील लॅपटॉप, प्रिंटर, फर्निचर, एसी, कागदपत्रे यासह जवळपास तीन लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली होती. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.