आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बुलडाण्यातील मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग; डोळ्यांसमोर लाखो रूपयांचे नुकसान

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. दरम्यान, आज ६ एप्रिल रोजी शहरातील कुरेशी ले आऊट मधील साई मंडप डेकोरेशनला भीषण आग लागली. या आगीत मंडप डेकोरेशनसह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत मंडप मालकाचे जवळपास वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज बुधवारी चार वाजेच्या सुमारास घडली.

शहरातील कुरेशी लेआऊट मध्ये राजू शेळके यांचे श्री साई मंडप डेकोरेशन आणि बिछायतचे गोदाम आहे. दरम्यान, आज दुपारी चार वाजेच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. गोदामात गाद्या व कापडी मंडप असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. गोदामामधून आगीचे व धुराचे लोट उठत होते. गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच असंख्य बघ्यांनी कुरेशी ले आऊटकडे धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत राजू शेळके यांचे वीस लाखांचे नुकसान झाले.माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ दोन लाख रुपये मदतीची घोषणा केली.

बातम्या आणखी आहेत...