आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्यागिक वसाहत:गोदामाला आग लागून कापसाच्या गाठी, बारदाना जळून खाक ; गोदाम मालकाचे कोट्यवधींचे नुकसान

खामगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या चेतन चोपडा यांच्या गोदामाला आज ९ जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे निश्चित कारण समजू शकले नाही. या आगीत कापसाच्या ३ हजार गाठी व ५० हजार रुपयांचा बारदाना जळून खाक झाला आहे. या घटनेत गोदाम मालक चोपडा यांचे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये चेतन चोपडा यांचा गोदाम आहे. या गोदामात त्यांनी कापसाच्या गाठी व बारदाना भरून ठेवला होता. दरम्यान, आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक गोदामाला आग लागली. या आगीची माहिती येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यानंतर ही आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून शेगाव व नांदुरा येथील पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. तीनही अग्निशामक दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. वृत्त लिही पर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. आगीचा धग वाढतच होता. या आगीमुळे गोदामाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खामगाव, नांदुरा व शेगाव येथील २२ पाण्याच्या बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न सुरु होते. ही घटना येथील औद्योगिक परिसरात कळताच तेथे मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती गोदाम मालक चेतन चोपडा यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...