आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज माघारीकडे:निवडणुकीचे पहिले रिंगण’ पूर्ण; अनेकांचे लक्ष अर्ज माघारीकडे

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याच्या (२ िडसेंबर) या शेवटच्या दिवशी रिंगणात उतरणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून आले. अखेरच्या दिवसापर्यंत जिल्ह्यात सरपंच पदासाठी एकूण १ हजार ४५२ अर्ज, तर सदस्यपदासाठी ५ हजार २९२ अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज मागे घेण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंत मुदत असून, त्यानंतरच लढती निश्चित होणार आहेत. त्यामुळे आपला कोणता प्रतिस्पर्धी अर्ज मागे घेणार? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

२७९ ग्रामपंचायतींच्या एकूण ८७१ प्रभागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये दोन हजार ३२७ सदस्यांची निवड केली जाणार आहे. दि. २८ नोव्हेंबरपासून सुरू झालेली अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू होती. त्यातच ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागत असल्याने तांत्रिक कारणास्तव विलंबही लागत होता. पहिल्या दिवशी तर काही तालुक्यांमध्ये एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यानंतर दि. २९ नोव्हेंबर या दुसऱ्या दिवशीपासून इच्छुकांकडून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. ऑनलाइन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे निवडणूक आयोगाने अखेर ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली. त्यामुळे इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला. अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये दिसून आले.

सरपंच, सदस्यपदासाठी जिल्ह्यात कुठे किती अर्ज.. बुलडाणा १२ ३३९ चिखली १३३ ४८३ देऊळगावराजा ९२ ३७२ सिंदखेडराजा १६१ ६३१ लोणार १८५ ८७५ मेहकर २४९ ९१२ खामगाव १०० २७३ शेगाव ४६ १३२ मलकापूर ५६ २४७ नांदुरा ६९ २५७ जळगाव जामोद ६३ मोताळा ९२ २६७ संग्रामपूर ७७ २९४

बातम्या आणखी आहेत...