आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन:पहिले राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलन 26 जून रोजी ; अध्यक्षपदी कॉ. राजकुमार घोगरे यांची निवड

खामगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त पाहिले राष्ट्रीय बळीराजा साहित्यसंमेलनाचे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात जिल्ह्यातील साहित्यिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तासगाव शहरातील नगर परिषदेच्या संस्कृतिक भवनात आयोजित या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध विचारवंत, सैद्धांतीक मार्क्सवादाचे अभ्यासक कॉ. राजकुमार घोगरे यांची निवड करण्यात आली आहे. तर स्वागताध्यक्ष पदी सुभाष आर्वे यांची निवड करण्यात आली आहे. दोन दिवसीय साहित्य संमेलनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्याच्या शोषणपिडणावर सांस्कृतिक, आर्थिक अशा चौकस अंगाने चर्चा होणार असून देशभरातील अनेक विचारवंत या संमेलनात सहभागी होणार आहेत.

या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट म्हणजे यात कवी संमेलन आणि विविध परिसंवादाशिवाय शेतकऱ्यांची संस्कृती उलगडणाऱ्या विविध कार्यक्रमाचे सादरीकरणही होणार असल्याचे संमेलनाचे मुख्य आयोजक बाळासाहेब रास्ते यांनी सांगितले आहे. हे राष्ट्रीय स्तरावरील बळीराजा साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी राज्य तसेच देश भरातून हजारोंच्या संख्येने विचारवंत, कवी, साहित्यिक, शेतकरी, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक बालासाहेब रास्ते व समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...