आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:मलकापूर दंगलीतील फरार पाच आरोपींना अटक

मलकापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीतील आरोपींना शहर पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.फरार व पाहिजे असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात यावे, असे आदेश पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी शहर पोलिसांना दिले होते.

या आदेशाच्या अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने मागील दोन दिवसांपासून फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची शोध मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत २०१६ मध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी होवून फरार असलेल्या, शफिक खान इनायत खान पठाण(४७), इमरान खान अयुब खान (२५), सै. मोहसीन सै.अजिम (२७), शेख फिरोज शेख आदील पटेल (३७) रा. इस्लामपूरा, शेख आसिफ शेख उस्मान (३२) या फरार आरोपींना शनिवारी दुपारी अटक केली.

बातम्या आणखी आहेत...