आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:शिवसाई च्या पाच मुलांची एमबीबीएससाठी निवड

बुलडाणा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात राहून आपला पाल्य एमबीबीएस साठी निवडला जाणे हे बहुतांश पालकांचे स्वप्न असते यासाठी प्रयत्नांचा आटापिटा केला जातो. पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणे अवघड असले तरी शिवसाई युनिव्हर्सलच्या अनुभवी शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे संस्थेचे पाच विद्यार्थी एमबीबीएस साठी पात्र ठरले. दरम्यान, नेहा जंजाळ, अवंतिका पाटील, साक्षी पवार, अंकित गायकी, मयुरी सोनुने या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष डी. एस. लहाने यांचा सत्कार केला. १७ जुलै रोजी शनल टेस्टिंग एजन्सी द्वारा नीट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातून जवळपास अडीच लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये शिवसाईचे पाच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यामध्ये नेहा शेषराव जंजाळ हिला ५५८, अवंतिका सुहास पाटील हिला ५५०, साक्षी पवार हिला ५४४, अंकित गायकी हिला ५२०, प्रतीक्षा आसाबे ५०६ मयुरी सोनुने ४९८ गुण मिळाले. या यशामागे विद्यार्थी व शिक्षक, पालक, संस्था यांची खूप मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी डी. एस. लहाने यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना शिक्षक दाभाडकर, राजेश कुमार, रमाकांत दीक्षित, नीरज राजपूत, शरद दुबे, सतीश बायनाडे, रिजवान खान, रमेश कुमार व नॅशनल व बोर्ड फॅकल्टी योग्य मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, संस्था अध्यक्ष डी. एस. लहाने व शिक्षकांना दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...