आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागतवर्षीही कोरोनाचे निर्बंध लागू असल्यामुळे भेंडवळच्या मांडणीचे भाकीत लोकांसमोर मांडले होते. गर्दीवर मर्यादा असली तरी मागील वर्षी गर्दी झाली होती. यावर्षी मात्र मर्यादा उठवण्यात आल्याने निर्बंधमुक्त भेंडवळच्या मांडणीचे भाकीत वर्तवले जाणार आहे. गेल्या तीनशे वर्षांपासून चंद्रभान वाघ यांचे वंशज अक्षय तृतीयेच्या दिवशी भेंडवळ येथे घट मांडणी करतात. त्यानुसार आज ३ मे रोजी सायंकाळी या घटाची मांडणी करण्यात आली. उद्या ४ मे रोजी त्याचा भाकीत वर्तवले जाणार आहे. राजकीय, सामाजिक व पिकांच्या बाबतीतील भाकीते वर्तवले जाणार आहे. या भाकिताकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
गतवर्षी पिकांची परिस्थिती सर्व साधारण सांगण्यात आली होती. राजा कायम राहणार आहे. मात्र देशात घुसखोरीचे प्रमाण वाढणार असून राजाभोवती अडचणी वाढणार आहे. आर्थिक मंदीचे राहणार असल्याने अर्थव्यवस्था डबघाईस येणार आहे. पर्जन्यमान ठीक असून पाणी टंचाई जाणवणार नाही. रोगराई अजुनही कायमच राहणार असल्याचे संकेत भेंडवळच्या मांडणीतून देण्यात आले आहेत. त्यातील भाकित बहुतांशी खरे ठरले आहे. गतवर्षी १५ मे रोजी भाकीत वर्तवण्यात आले होते.चंदभान महाराजांचे वंशज पुंजाजी वाघ व त्यांचे सहकारी सारंगधर वाघ यांनी हे भाकीत मांडले होते.
आज घट मांडणी झाली असून, उद्या पुंजाजी वाघ महाराज व घरातील इतर व्यक्ती ४ मे रोजी सकाळी ६ वाजता घटातील प्रत्येक धान्य, घट व घागरी वरील सांडोई, पापड यांचे निरीक्षण करणार आहेत. त्यावरुन भाकीत सांगतात. घटाची मांडणी बस स्थानकाच्या बाजूच्या शेतात केली जाते. दीड बाय दोन फुटाचा खोल खड्डा खोदून त्यावर पाण्याची घागर ठेवण्यात आली. त्या खड्ड्यात चार मातीचे ढेकळे ठेवून त्यावर पाण्याची घागर ठेवण्यात आली. घागरीवर सांडोई, कुरडोई, पापड ठेवण्यात आले. खड्ड्यात जमिनीवर पान विडा ठेवण्यात आला. समान अंतरात धान्य व इतर साहित्य ठेवण्यात आले. हे सर्व करुन वाघ कुटूंब घरी निघून गेले.
घटाची पाहणी केल्यानंतर भाकीत वर्तवण्याची परंपरा तीनशे ते साडेतीनशे वर्षांपासून आजही आहे कायम
घटाची पाहणी केल्यानंतर भाकीत वर्तवण्याची परंपरा तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून आजही कायम आहे. त्यानुसार मागील वर्षी भाकितानुसार कापसाचे पीक, ज्वारी, मूग, गहु, हरबरा ही पिके सर्वसाधारण राहणार आहेत. तुरीचे पीक कमी प्रमाणात होणार आहे तर तिळाचे पीक चांगले राहणार आहे. अशी पीक परिस्थिती वर्तवण्यात आली होती. पर्जन्यमानाची भाकीत मांडताना महाराजांनी सांगितले होते की, जून महिन्यात सार्वत्रिक पाऊस नसून कमी अधिक प्रमाणात काही भागात पडणार आहे. जुलै महिन्यात सार्वत्रिक व जास्त प्रमाणात पाऊस पडेल, ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला राहील, सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी तर काही भागात पावसाची आवश्यकता भासणार आहे.
घट मांडणीत ठेवल्या या वस्तू
अठरा धान्यामध्ये अंबाडी, सरकी, ज्वारी, तुर, साळी, हिवाळी मूग, बाजरी, भादली, उडीद, तीळ, मठ, जवस, गलू, लाख, वाटाणा, हरभरा, करडी, मसूर तर इतर साहित्यामध्ये पुरी, भजे, करंजी, वडे, घागर, मातीची ढेकळे यांसह इतर वस्तू ठेवण्यात येतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.