आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:मासरूळ येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी, रब्बी हंगाम शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कापूस पिकातील उत्पादन वाढीकरिता विविध उपाययोजना त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य पोषण व कीड तथा रोग नियंत्रण करून कापसाची एकरी उत्पादकता वाढवणे काळाची गरज असल्याबाबत माहिती दिली. उत्पादन वाढवण्यासाठी गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी फवारणी खर्च कमी करून बंधन या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे, असे साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, जोधपूर तथा तांत्रिक सल्लागार अग्रोविजन फाउंडेशन, नागपूरचे अध्यक्ष डॉ.सी.डी.मायी यांनी सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बुलडाणा, ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूर, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, जोधपुर, स्मार्ट टेक्नॉलॉजी लिमिटेड फाउंडेशन (महाधन) तसेच कृषि विभाग व आत्मा, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने मासरूळ येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मेळावा तसेच रब्बी हंगाम पूर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला चे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. उंदीरवाडे हे होते. यावेळी डॉ. सी.डी. मायी हे बोलत होते. अध्यक्ष, हे होते. प्रमुख उपस्थिती कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अनिल तारू जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे, महाधन चे क्षेत्रीय प्रशिक्षक डॉ. निशिकांत इनामदार व विपणन व्यवस्थापक गोपाल महाजन, कृषि संशोधन केंद्र वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जायभाये, तालुका कृषी अधिकारी टेकाळे, कोरोमंडल अधिकारी गजानन जाधव, मासरूळ सरपंच मधुकर महाले, शेतकरी प्रतिनिधी शंकरराव सावळे, दिलीप सिनकर, पंचायत समिती सदस्य दादाराव महाले प्रगतशील शेतकरी हरिभाऊ सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील कृषि विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांना कशा पद्धतीने झाला याबाबत माहिती देऊन येणाऱ्या हंगामासाठी हरभरा पिकात पेरणी पूर्वी बियाण्यास शिफारसीत बीजप्रक्रिया अवश्य करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र डॉ. प्रवीण देशपांडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कृषि विस्तार शिक्षण तज्ञ डॉ. जगदीश वाडकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...