आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडी:बुलडाणाच्या माजी आमदाराला दिल्ली पोलिसांकडून अटक ; राहुल गांधी यांना  ईडीने नोटीस बजावली

बुलडाणा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. यामध्ये बुलडाण्याचे माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनाही अटक करण्यात आले. अटकेनंतर मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांना ईडीची नोटीस आल्यानंतर दिल्ली येथे त्यांच्या समर्थनार्थ गेले होते. तेथे त्यांनी काँग्रेस करत असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. दिल्ली पोलिसांनी कार्यकर्त्यांचा वाढता आक्रोश बघता त्यांना स्थानबद्ध करण्याचे पाऊल उचलले. यावेळी कन्हैय्याकुमार यांच्या सोबत असलेले हर्षवर्धन सपकाळ यांनाही स्थानबद्ध करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...