आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस पक्षाच्या सुरू असलेल्या डिजिटल सदस्य नोंदणीमध्ये मेहकर तालुका हा जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर आहे. मेहकरचे माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणीमध्ये मेहकर शहरात आजपर्यंत ६ हजारांच्या वर सदस्य नोंदणी केली. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांचा व वैभव उमाळकर यांचा सत्कार जिल्ह्याचे प्रभारी नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, मदन भरगड, विजय अंभोरे, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, अॅड. अनंत वानखेडे, जयश्री शेळके, धनंजय देशमुख, माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे, कैलास सुखदाने, कलीम खान, उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले. याप्रसंगी अनंत वानखेडे यांनी पक्षाच्या कामकाजाबद्दल आढावा दिला. तसेच जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातून प्रत्येक नेत्यांनी आप आपला आढावा सादर केला. तर श्याम उमाळकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, प्रत्येकांवर आप आपली जबाबदारी फिक्स करायला पाहिजे. जे काम करतात त्यांनाच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे तिकीट द्यायला पाहिजे याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी तर आभार गजानन खरात यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.