आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला नकली नोटा प्रकरणात अटक; आतापर्यंत एकूण सात जण ताब्यात

बुलढाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नकली नोटा प्रकरणात एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. शहेजाद खान असे आरोपीचे नाव आहे. 23 फेब्रृवारी मलकापूर शहरातील एचडीएफसी बँकेत नकली नोटा जमा करतांना हा सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी झालेल्या प्रकरणाबद्दल चौकशी केली आसता, यावेळी एमआयएमच्या पक्षातून महिनाभरापुर्वी पायउतार झालेले नगरसेवक शहेजाद खान यांना मालीपूरा मंगलगेट परिसरातून बुधवारी अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी न्यायालयाने शहेजाद खान यांना पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी ईरफान हनीफ पटनी हा असून याच्यासह खामगाव, मलकापुर, नांदुरा येथून आतापर्यंत सहा आरोपींना शहर पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. शहेजाद खान याच्या नावाची कबुली या आरोपीचा कबूली दिल्याने तातडीने पोलियांनी त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आरोपीला दिले आहेत. नकली नोटा चलनात आणणाऱ्यांची जणू एक जिल्हाभरात साखळीच असून लवकरच या साखळीचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याचे तपस अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच, शहरातील आणखी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तर एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला नकली नोटा प्रकरणात अटक करण्यात आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...