आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ.बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांच्या केलेल्या अवमानाबद्दल जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ.संजय कुटे यांच्यावर कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत वाघोदे यांच्या नेतृत्वात आज १३ डिसेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा यांच्याकडे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये आर.एस.एस. व भाजप सामाजिक वातावरण बिघडविण्याचे काम करीत असून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम या संघटना करत आहेत. अशातच जिल्ह्यातील माजी मंत्री आणि जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे यांनी मागील आठवड्यात ६ डिसेंबर रोजी त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी प्रसंगी व त्याच दिवशी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असताना, आमदार डॉ.कुटे यांनी त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या वडिलांच्या फोटो सोबत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो बरोबरीत लावून संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना एकप्रकारे अवमानित करण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे आंबेडकरी व बहुजन अनुयायी यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
त्यामुळे अशा कृत्याचा धिक्कार करणे आवश्यक आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार संग्रामपूर व ठाणेदार जळगाव जामोद यांना देण्यात आले होते. परंतू या निवेदनावर कोणत्याच प्रकारची ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वरील बाबींची गंभीर दखल घेवून सखोल चौकशी करण्यात यावी व दोषीवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात नमूद असून कार्यवाही न झाल्यास आमदार डॉ.संजय कुटे यांचे निवास स्थानासमोर २३ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या माध्यमातून आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रशांत वाघोदे, जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव, शहराध्यक्ष मिलिंद वानखडे, तालुका संघटक अरुण सरदार, शहर महासचिव दिलीप राजभोज, विजय राऊत, सदस्य राजू वानखेडे, नंदकिशोर माळी,अमोल गवई, जमील शाह, संदीप लहाने, अमोल राजमाने, भागवत दांडगे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.