आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर घटना:बोथा घाटात माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या वाहनाला अपघात

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती येथे जाण्यासाठी निघालेले मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या वाहनाचा व समोरुन येणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर मार लागला नाही. परंतु आमदार संचेती यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना खामगाव-बुलडाणा मार्गावरील बोथा घाटात बुधवारी दुपारी घडली.

मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चैनसुख संचेती हे बुलडाणा येथून अमरावती जाण्यासाठी आपल्या खासगी वाहनाने खामगावच्या दिशेने निघाले होते. बोथा गावाजवळ येताच त्यांच्या वाहनाला समोरुन येणाऱ्या एम.एच. ४०/ एन/ ९१५३ या क्रमांकाच्या बसेन जबर धडक दिली. यावेळी संचेती यांचा वाहन चालक नीलेश राजपूत याने वेळीच आपल्या वाहनावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून वाहनातील कुणालाही दुखापत झाली नाही. परंतु या अपघातात संचेती यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या वाहनात माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यासह त्यांचा पुुतण्या यश संचेती व चालक नीलेश राजपूत हे होते.

बातम्या आणखी आहेत...