आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे धरणे आंदोलन:रस्त्यावर उतरण्याचा माजी तालुका प्रमुख प्रा. डॉ. अनिल अमलकारांचा इशारा

खामगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेत्या विरोधात सूड बुद्धीने सुरू असलेल्या ईडी, सीबीआय सारख्या सरकारी यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर सुरू आहे. त्याचा गैरवापर शिवसेना खपवून घेणार नाही. या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा माजी तालुका प्रमुख प्रा. डॉ. अनिल अमलकार यांनी दिला. यावेळी धरणे आंदोलन करण्यात आले व मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केंद्र सरकार विविध यंत्रणांचा गैरवापर करत आहे. याविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरेल. तसेच केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालयाने भूगर्भ पाण्याचा उपसा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यत नोंदणी करण्याचा तुघलकी निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना पिकासाठी लागणारे पाणी इतर उद्योग लागणारे पाणी नोंदणी करूनच द्यावे लागणार आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा.तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये भरपाई जाहीर करावी. केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी वाढत आहे. यामुळे तरुण आत्महत्या करत आहेत. या धोरणाविरोधातदेखील शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केंद्र सरकारला देण्यात आला आहे.

या निवेदनावर शिवसेना माजी तालुका प्रमुख प्रा. अनिल अमलकार, रवी महाले, हरिदास हुरसाड, माजी शहर प्रमुख रवि गुजर, देविदास उमाळे, महिला आघाडी शहर प्रमुख भारती चिंडाले, कृउबास प्रशासक श्रीराम खेलदार, विजय बोर्डे, सूरज बेलोकार, विजय इंगळे श्रीकृष्ण कळसकार, संतोष हरणे, डॉ. दिलीप चव्हाण, विजय बोदडे, संजय खारोडे, संतोष चव्हाण, आनंद चिंडाले, प्रा. लकरे, मुकेश सरोदे, रामेश्वर लाहुडकार, गणेश हाडे, जनार्दन पाटील, मंगेश गायकी, सागर गावंडे, दीपाली श्रीनाथ, मंदाबाई चव्हाण, भास्कर कळसकार, सुनीता चिलवंत, नंदा कोल्हे, कविता हेलोडे, चंदा तिवारी, सतीश महाजन, नीलेश पारस्कर, वासुदेव वानखडे, अजय पाटील, गणेश मुढे, बळीराम गवळी, विष्णू मुहे, मुरलीधर टोगळे, दत्ता कालुसे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...