आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल सट्टा:आयपीएल क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या चार जणांना अटक; 82 हजार 70 रुपयांचा माल जप्त

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जलालपुरा येथे सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या चार जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी आरोपीच्या ताब्यातून बारा मोबाइल, एक लॅपटॉप आणि इतर साहित्य असा ८२ हजार ७० रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई ३ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे.

जलालपुरा भागात आयपीएल क्रिकेट सामन्यावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी ३ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास क्रिकेट अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या राजेश रामेश्वर जोशी वय ४८ वर्षे रा.जगदंबा नगर जलालपुरा खामगाव, मुदस्सर नजर हरून रशीद वय ४२ रा. जलालपुरा, शशिकांत नारायणदास शर्मा वय ५८ रा. लक्ष्मी नगर चांदमारी खामगाव आणि गजेंद्र रतनलाल शर्मा वय ३० रा. बालाजी मंदिर खामगाव, या चार आरोपींना अटक केली आहे.

पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सट्टा चालवणाऱ्या राजेश जोशी यांच्यासह उपरोक्त चार जणांविरुद्ध आज ४ एप्रिल रोजी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...