आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांत नव्या आजाराची चिंता:जिल्ह्यात स्क्रब टायफस चार रुग्ण ;  स्वाइन फ्ल्यूचाही रुग्ण आढळला

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड आजाराचे रुग्ण सध्या कमी आढळत आहेत. मात्र इतर आजारांनी आता डोके वर काढणे सुरु झाले आहे. शेतकरी तर स्क्रब टायफस या आजारामुळे आता एका नव्या चिंतेत सापडला आहे. तर नागरी वसाहतीतील माणूस स्वाइन फ्लूच्या आजारामुळे चिंतेत सापडला आहे. असे असताना बुलढाणा शहरात या दोन्ही आजाराची तपासणी करणारे केंद्र स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर उघडण्यात आले असून त्यामुळे निदान लवकर होण्याचा दिलासा रुग्णाला मिळाला आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सध्या १९ इतकी आहे. दररोज किमान एक किंवा दोन रुग्ण आढळून येत आहेत. मात्र उपचाराने ते बरे होत आहेत. आजही पाच रुग्णांना बरे वाटल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. कोरोनाचा विषाणू कमी होत असताना स्वाइन फ्ल्यूने बुलडाण्यातील इक्बाल नगरात एक ३५ वर्षीय रुग्ण आढळून आला होता. या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आणखी एक रुग्ण जिल्ह्यात आढळून आला आहे. लोणार शहरातील हा रुग्ण असल्याने लोणारमध्ये ही चिंतेचे वातावरण आहे. हा आजार डुकरांमुळे होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. डुकरांची संख्या मात्र घाणीमुळे वाढतीच आहे. पालिका प्रशासनाकडून डुकरांचा बंदोबस्त केला जात नाही किंवा संबधित मालकांना तंबी दिली जात नाही. स्क्रब टायफस हा आजार उंदरामुळे होतो. उंदराच्या रक्तावर या आजाराचे किटाणू वाढतात. हे उंदीर उंच गवत, झाडा झुडपात जातात तेव्हा हे जिवाणू मानवाच्या संपर्कात आल्यानंतर हा आजार होतो. शेतकऱ्यांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. कारण शेतात उंदीर बिळातृून बाहेर येतात. शहरी भागात गवत वाढण्याचे प्रमाण फारच तुरळकच आहे. या आजाराचे चार रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. हा आजार मात्र उपचाराने बरा होतो.

दोन्ही आजाराची लस उपलब्ध
स्वाइन फ्लू व स्क्रब टायफस या दोन्ही आजाराची लस आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे. लक्षणे बहुतांश या आजाराची व कोरोनाची सारखीच आहेत. थोडा फार बदल आहे. या आजारावर त्वरीत उपचार होत असला तरी लोणार येथे आढळून आलेल्या स्वाइन फ्लू या आजाराच्या रुग्णावर अकोला येथे उपचार सुरु आहेत. आता टायफेड हा आजारही बळावत चालला आहे. पावसाची संततधार असल्याने अनेकजण पावसात भिजल्यानेही आजार बळावले आहेत.

स्क्रब टायफसचे रुग्ण वाढण्याची शक्यता
सध्या गवताचे प्रमाण वाढलेले आहेत. बहुतांश प्रमाणात शेतकरी शेतात काम करत असल्याने या गवतातील किटकांमधून हा आजार होत आहे. सध्या जिल्ह्यात चार रुग्ण आढळले असून स्वाइन फ्ल्यूपेक्षा या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र यावर आपल्या जिल्ह्याचे उपचार होत आहेत. औषधोपचाराने रुग्ण बरा होतो. विशेष म्हणजे कोणत्याही लॅबवर या आजाराचे निदान तपासणी नंतर होते.
प्रकाश तांगडे पाटील, वैद्यकीय अधिकारी साथरोग.

स्क्रब टायफसची लक्षणे
ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कोरडा खोकला, न्युमोनिया सदृष्य आजार अशी लक्षणे आहे. कीटक चावल्याने खाज येते व अंगावर चट्टे येतात. दंश झालेल्या ठिकाणी जखम होऊन खपली येते. रोगाची लक्षण आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...